MB NEWS:अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन



परळी -प्रतिनिधी - ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे.गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा.संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. आपल्या किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा देखील उपयोग करत असत.गाडगे बाबा ज्या ही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावक.यांना गांव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत.सामाजिक प्रबोधनातुन लोकांच्या मनात ज्या अंधश्रध्दा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा, ( बोकड कापणे, कोंबडं कापुन देवाला वाहाणे) लोकांच्या मनातुन उदाहरण देऊन गाडगे बाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत. गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्याचा उपयोग गाडगे बाबा गावाच्या विकासाकरताच करत असत.गावातुन मिळालेल्या पैश्यातुन गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालयं आणि जनावरांकरता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खुप प्रयत्न केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार