MB NEWS:नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

 नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश


बीड: प्रतिनिधी...

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासह काही भागात धुमाकूळ घालणार्‍या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक अधिकारी नितीन काकोडकर यांनी दिले आहेत. 

गेल्या महिनाभरापासून बीड, नगर जिल्ह्यातील सीमेनजिक बिबट्याने दहशत माजविली आहे. पैठण, अंबड, पाथर्डी, करमाळा, आष्टी या भागात बिबट्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली वावरत होते. वनविभाग, पोलिस, ग्रामस्थांनी शोध घेऊनही बिबट्या सापडत नव्हता. पाथर्डी तालुक्यात दोन, आष्टी तालुक्यात तीन व करमाळा तालुक्यात तीन जणांना बिबट्याने ठार केले होते, तर चारहून अधिक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची कामे करणे अवघड झाले होते.

सध्या शेतामध्ये तूर, कापूस, ज्वारी ही पिके उभी असून त्यांना पाणी देणे, औषध फवारणी करणे, खुरपणी करणे तसेच राखण करणे ही कामे करणे शेतकर्‍यांना अपरिहार्य बनले असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली होती. आ. सुरेश धस यांनी वनविभागाच्या औरंगाबाद, नागपूर येथील अधिकार्‍यांनी एक डिसेंबर रोजी पत्र पाठविले होते. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 11(1) (क) नुसार मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या अनुसूची - 1 मधील वन्य प्राण्यास जेरबंद करणे / बेशुद्ध करणे / ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे त्यात नमूद केले होते. या पत्राची दखल घेत राज्याचे मुख्य वनरक्षक अधिकारी नितीन काकोडकर यांनी रविवारी रात्री बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !