MB NEWS:श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*

 श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*

परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहर व तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात मंगळवारी (दि.०८) उत्साहात साजरी करण्यात आली.    

         श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शनिमंदिरात तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर मान्यवरांनी श्री.जगनाडे महाराज यांचा जिवनपट मांडला. हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील एक प्रमुख टाळकरी होते. तुकाराम महाराजांनी ज्या रचना रचल्या त्या सर्व जगनाडे महाराजांना मुखोद्गत होत्या. तुकाराम महाराजांच्या रचना व गाथा लिहीण्याचे कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले. तेली समाज संताजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात परिचय झाला. वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षांपासून जयंती, पुण्यतिथी साजरी करतात. तसेच महाराष्ट्र शासनाने शासकीय परिपत्रकामध्ये जयंतीचा समावेश केला. या कार्यक्रमास संघटनेचे सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळी येथील शनिमंदिरात श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करताना तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान चे कार्यकर्ते.

परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री.जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करताना चंद्रकांत सोनवणे, जयंत कराड,गणेश फुटके, अँड.शिवानंद फुटके, ग्रामसेवक श्री.शेळके

परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करताना महाविद्यालयातील कार्यालयीन प्रमुख प्रमोद पत्की, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. नेरकर व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार