MB NEWS:पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशाने परळी - अंबाजोगाई तालुक्याच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समित्या गठित*

 *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशाने परळी - अंबाजोगाई तालुक्याच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समित्या गठित*



*परळी समितीच्या अध्यक्षपदी अय्युब शेख तर अंबाजोगाई समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब गंगणे यांची नियुक्ती*


परळी (दि. ०८) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्याच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या समित्या गठित केल्या असून या समितीच्या परळी तालुकाध्यक्ष पदी धर्मापुरी येथील शेख अय्युब यांची अंबाजोगाई तालुक्याच्या अध्यक्ष पदी राडी येथील बालासाहेब गंगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामकाजाचे देखरेख व नियंत्रण करण्यासाठी ही समिती नेमण्यात येते. या दोन्ही तालुक्यात वास्तव्यास असलेले विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांची सदस्य म्हणून, तसेच स्थानिक तहसीलदार यांची या समितीचे सदस्य सचिव म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे.


परळी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत, अध्यक्ष शेख अय्युब यांच्यासह आ.संजय दौंड, पंचायत समितीच्या सभापती सौ. उर्मिला गित्ते, विजयकुमार गंडले, विश्वनाथ गायकवाड, ऍड. अमोल सोळंके, संजय फड, सुनील निवृत्ती मुंडे, सौ. गवळणबाई गित्ते, सौ. कांताबाई राठोड यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


अंबाजोगाई तालुक्यात अध्यक्ष बालासाहेब गंगणे यांच्यासह आ. संजय दौंड, पंचायत समिती सभापती सौ. विजयमाला जगताप, हनुमंत गायकवाड, सुधाकर जोगदंड, शिवाजी कुलकर्णी, गौतम चाटे, योगेश देशमुख, गणेश भगत, सौ. बालिका धुमाळ यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


या दोन्ही तालुक्यातील नेमणुकांवरून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंग साधल्याचे दिसून येत असून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे.


दोनही तालुक्यातील या समित्यांच्या नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले असून, रोजगार हमी योजनेतील कामकाज अत्यंत जबाबदारीने पार पाडून या समितीला व प्राप्त पदाला तसेच मतदारसंघातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून द्यावा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार