MB NEWS:लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त फिटनेस शिबिराचे आयोजन- निळकंठ चाटे

 लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंतीनिमित्त फिटनेस शिबिराचे आयोजन- निळकंठ चाटे 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

 लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजयुमोच्या वतिने क्रिडा क्षेत्रातील मुला- मुलींसाठी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.11 डिसेंबर रोजी फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन या शिबिराचा मुला-मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा संयोजक निळकंठ चाटे यांनी केले आहे.

               लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची दि.12 डिसेंबर रोजी जयंती असुन यानिमीत्त भाजयुमोच्या वतिने दि.11 डिसेंबर रोजी शहरातील नटराज रंग मंदिर प्रांगणात क्रिडा क्षेत्रातील मुला- मुलींसाठी फिटनेस शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीरात सहभागी होणार्या मुला- मुलींची तज्ज्ञ ट्रेनर इमरान खान यांच्या मार्फत डायट बद्दल योग्य ते मार्गदर्शन व मुला-मुलींची फिटनेस शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम़ाचे आमलबजावणी करण्यात येणार असुन या शिबीराचा मुला - मुलींनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा संयोजक निळकंठ चाटे व सर्व युवक सहकार्य यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार