MB NEWS:परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पद आरक्षणाची सोडत सुरू

 परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पद आरक्षणाची सोडत सुरू


 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

    परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाचे आरक्षण करण्यासाठी सोडत सुरू झाली आहे. काही वेळातच हे आरक्षण जाहीर होणार असुन सोडतीसाठी गाव पुढारी व इच्छुक उमेदवारांनी तसेच नागरीकांनी मोठी उपस्थिती लावली आहे.

     परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीची संख्या नव्वद असून ग्रामपंचायत सरपंच पदाचे तालुकास्तरीय आरक्षण क्षण 2020 ते 20255 या कालावधीसाठी जिल्हास्तरावरून निर्धारित करण्यात आलेले आहे. परळी तालुक्यातील निर्धारित आरक्षण: अनुसूचित जातींसाठी एकूण 15 ग्रामपंचायत, अनुसूचित जमातींसाठी एकूण 12 ग्रामपंचायत, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 24 ग्रामपंचायत, खुल्या प्रवर्गासाठी एकूण 50 ग्रामपंचायत सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित होणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायत निहाय आरक्षणाची सोडत काढून ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित केले जाणार आहे.आज  दिनांक आठ डिसेंबर 2020 रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय येथे ही सोडत सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !