MB NEWS :*समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभरात जागो सरकार जागो आंदोलन*

 *जानेवारीत ताम्हण-पळी बजाओ* 


*समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभरात जागो सरकार जागो आंदोलन*


*औरंगाबाद येथे होणार 22 जानेवारीला समारोप*



जालना-


समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक जालना येथे नुकतीच घेण्यात आली. समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी समितीच्या वतीने जागो सरकार जागो अभियान सुरू असून हिवाळी अधिवेशनात समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास जानेवारी 2021 मध्ये ताम्हण-पळी बजाओ आंदोलन करणार असल्यासाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.


समस्त ब्राह्मण समाजाच्या माफक व न्याय मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून सरकार दरबारी खितपत पडल्या आहेत. अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने समाजाच्या वतीने करून शासन-प्रशासनास मागण्यांची निवेदने देऊनही यावर कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊन समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी संघर्ष समितीच्या वतीने आजी माजी मंत्री, खासदार आमदार यांना भेटून प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले असून समाजाच्या मागण्यांचा हिवाळी अधिवेशनात गामभिर्याने विचार न केल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक जालना येथे घेण्यात आली. या बैठकीत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा काय असावी याबाबत सविस्तर चर्चा करून 22 जानेवारी 2018 रोजी मुबंई येथे आझाद मैदानावर महाधरणे आंदोलन हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले होते हा दिवस "ब्राह्मण ऐकता दिवस" असून जानेवारी 2021महिन्यात 1 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यत राज्यातील सर्व जिल्ह्यात-तालुक्यात सरकारला जागे करण्यासाठी "ताम्हण-पळी बजाओ आंदोलन" करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले असून या आनोदानाच्या तयारीसाठी प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर बैठका घेऊन या आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या आंदोलनाचा समारोप 22 जानेवारी 2021 रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालया समोर भव्यदिव्य आंदोलन करून करण्यात येणार असल्याचेही निश्चित करण्यात आले असून समाज बांधवानी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तयारीला लागावे असे आवाहन असे आवाहन प्रमोद पुसरेकर बीड , धनंजय कुलकर्णी केज , दिपक रणनवरे जालना , सौ. विजयाताई कुलकर्णी औरंगाबाद , सौ. विजयाताई अवस्थी औरंगाबाद , श्रीकांत जोशी अकोला , सौ. केतकीताई धाबे नागपूर यांच्या सह समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार