MB NEWS-भाजीपाला मार्केट संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्केट कमिटी समोर 22 जानेवारी रोजी धरणे आंदोलन*

 *भाजीपाला मार्केट संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्केट कमिटी समोर 22 जानेवारी रोजी धरणे आंदोलन*



*शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आंदोलनास होणार सुरूवात*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

*संभाजी ब्रिगेडच्या* वतीने वारंवार लेखी व तोंडी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच उपनिबंधक कार्यालयास निवेदन देऊन, परळी येथील भाजीपाला मार्केट अनधिकृतपणे शेतकऱ्यांची शेकडा दहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात अडत वाल्यांकडून लूट होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणारे शेकडा दहा रुपये कमिशन हे थांबवण्यात यावे. या *संभाजी ब्रिगेडच्या* मागणीच्या पूर्ततेची जबाबदारी कुठलेही प्रशासकीय कार्यालय घेण्यास तयार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या म्हणण्यानुसार भाजीपाला बीट मार्केट हे आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याकारणाने आम्ही या होणाऱ्या प्रकारास थांबाऊ शकत नाही, नगरपालिकेकडे यासंबंधी विचारणा केली असतात - आम्ही तेथील व्यापाऱ्यांना संबंधित जागा भाडेतत्त्वावर दिलेली असून त्या ठिकाणी होत असलेली खरेदी व विक्री कोणत्या भावाने व्हावी किंवा होऊ नये ही बाब आमच्या अखत्यारी मध्ये येत नसून याप्रकरणी आम्ही काहीही करू शकत नाही, असे नगरपालिकेचे म्हणणे आले. तहसील कार्यालयात यासंबंधी संपर्क केला असता - ही बाब मार्केट कमिटीच्या अखत्यारीतील असल्याकारणाने मार्केट कमिटी ने या बाबीवर मार्ग काढावा असे सांगितले गेले. त्या कारणाने कुठलेही प्रशासकीय कार्यालय संबंधित शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीकडे विशेष बाब म्हणून पाहत नसल्याकारणाने *संभाजी ब्रिगेड* व शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बेमुदत हलगी बजाव धरणे आंदोलन होत असून परळी पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा. असे आवाहन परळी *संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष सेवकराम जाधव, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, तालुका कार्याध्यक्ष प्रद्युम्न सोनवणे, कार्याध्यक्ष राम किर्दांत, तालुका उपाध्यक्ष दशरथ इंगळे, उपाध्यक्ष नंदू आबा शिंदे, तालुका संघटक हनुमंत दिवटे, तालुका सचिव कुंडलिक लोणकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण दादा गव्हाणे, कोषाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, तालुका संघटक हनुमंत जाधव यांनी केले आहे*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !