परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-सत्याचा विजय!* *धनंजय मुंडेंविरुद्ध 'त्या' महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे*

 *सत्याचा विजय!*


 *धनंजय मुंडेंविरुद्ध 'त्या' महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे*



मुंबई (दि. 22) ---- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर या प्रकरणात सत्याचा विजय झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा खोटा आरोप करत या महिलेने खळबळ उडवून दिली होती. 


कौटुंबिक कारणास्तव मी केस मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी याबाबत रेणू शर्मा यांच्याकडून लेखी शपथपत्र घेतले असल्याचेही समजते. 


आरोप होताच भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र मुंडेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग चा आरोप केला होता. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येउ द्या अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. 


दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांनी सबंध महाराष्ट ढवळून निघाला होता, मात्र धनंजय मुंडे यांच्या बोलण्यात मात्र अंतविश्वास दिसत होता. अगदी आरोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ना. मुंडे जनता दरबार घेताना दिसले होते. दरम्यानच्या काळात लोकांच्या भेटीगाठी, दैनंदिन कामकाज, बीड जिल्ह्यातील कामकाज, जनता दरबार आदी उपक्रम त्यांनी नियमित सुरू ठेवल्याने ते आश्वासक वाटत होते. 


या काळात रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग सह विविध तक्रारी दाखल झाल्याने प्रकरण रेणू यांच्यावरच उलटणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सुरुवातीपासून सावध भूमिका घेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नसून, या प्रकरणात काय ती चौकशी होऊन सत्य बाहेर येऊद्या अशी भूमिका घेतली होती.  


अखेर सत्य बाहेर आले असून, रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तर रेणू शर्मा ने अर्ध्यात माघार घेतल्याने त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनीही ही केस सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी या प्रकरणी सत्यता पडतळल्याशिवाय निष्कर्षाला येणे योग्य नाही, या प्रकरणात चौकशी करून खोलात जाण्याची गरज आहे, अशी भूमिका घेतली होती. आज रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यानंतर खा. पवार यांनी आपण घेतलेली भूमिका योग्यच होती असा पुनररुच्चार केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!