MB NEWS-प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण.

 प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण



बीड, दि. 25 :- (जि.मा.का.) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि.26 जानेवारी 2021 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.


याच बरोबर जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी राजेद्र जगताप यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 8.25 वाजता होणार आहे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता संपन्न होणार असून दोन्हीही ध्वजारोहण समारंभ संपल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान बीड येथील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सकाळी 8.45 पूर्वी शासकीय गणवेषात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार