MB NEWS-*लोकनेते मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढायचीयं - पंकजाताई मुंडे* *जनगणनेची मागणी ओबीसींना न्याय देण्यासाठीच*

 *लोकनेते मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढायचीयं - पंकजाताई मुंडे*



*जनगणनेची मागणी ओबीसींना न्याय देण्यासाठीच* 


औरंगाबाद । दिनांक २५ ।

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. ओबीसींना आणि वंचित समुदायाला न्याय देण्यासाठी आपण जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे, लोकनेते मुंडे साहेबांची ही अपूर्ण लढाई मला लढायचीयं असा पुनरूच्चार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.


   या प्रश्नांवर पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या,  

ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी मी केली आहे. कोणत्याही पदावर नसताना ही चळवळ मला लढायची आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी वेळोवळी मांडली. खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी देखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं त्या म्हणाल्या. जालना येथील ओबीसी मोर्चातील अनुपस्थिती बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, 'कार्यक्रमात असणं हे महत्वाच नाही, त्या चळवळीचा भाग आम्ही अनेक वर्षे आहोत' असही त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !