MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान* ● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●

 पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान  



● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●


परळी वैजनाथ / प्रतिनिधी..

        प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आज २६ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

        टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे सामाजिक, शैक्षणिक, भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय गुणवत्ता आदी सर्वदृष्टीने सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो.या अनुषंगानेच स्वच्छतेबाबत जाणीव जागृती बरोबरच घंटागाडी व दैनंदिन स्वच्छता विषयक व्यवस्थापन करत टोकवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरली.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018- 19 या वर्षात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये टोकवाडी तालुका परळी वैजनाथ गावाची जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर निवड करण्यात आलेली आहे. आज बीड येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावेळी पं.स. सभापती श्री बालाजी मुंडे, सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे व ग्रामसेवक सौ.आशा क्षीरसागर आदींनी टोकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पारितोषिक स्विकारले. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पारितोषिक पटकावल्याबद्द्ल टोकवाडी ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !