इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-सावरकर विद्यालयाच्या आॅनलाईन स्पर्धेचा निकाल घोषित. शेरकर निशा प्रथम पारीतोषीकाची मानकरी

 सावरकर विद्यालयाच्या आॅनलाईन स्पर्धेचा निकाल घोषित



शेरकर निशा प्रथम पारीतोषीकाची मानकरी

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वा.सावरकर विद्यालय बीड आयोजित दि. 12 जानेवारी 2021 स्वामी विवेकानंद तसेच राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वक्तॢत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मागील 20 वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून अभ्यासात्मक दुष्टीकोनातुन या अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर स्पर्धा आँनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत दोन गटात घेण्यात आली.3 री ते 4 ती. व 5 वी ते 7 वी या दोन गटात झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे यात पहीला गट प्रथम ,पिंगळे समर्थ प्रकाश द्वितीय, कुलकर्णी ऋती नागेश तर तॢतीय ,पोरवाल मोक्षा विशाल व दुसऱ्या गटात प्रथम, शेरकर निशा अजिनाथ द्वितीय, जाधव प्रतिक्षा नंदु तर तॢतीय,आगळे कांदबरी विकास .

विजेत्या विद्यार्थ्यांना कै.श्रीपादराव पांडव यांच्या स्मरणार्थ श्रीमती पांडव ताई या पारीतोषीके देऊन सन्मानित करणार आहेत.विजेत्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!