परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*





सोनपेठ दि.२६ (प्रतिनिधी) - 

         तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास खडका येथील पोलिस पाटील वैजनाथराव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.



         कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री एस.डी.जालमिले, आर.बी.जोशी, एस.एम.राठोड, एस.जी.चव्हाण, ए.एस.चाटे, व्ही.पी.महाजन,एन.आर. निळे, वाय.डी. बाळके,राम देशपांडे, राहुल कुलकर्णी, धनंजय भिसेगावकर, राजु चव्हाण,बापु चव्हाण, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, सोमनाथ सातपुते, दिलीप व्हावळे,लक्ष्मण आडे, मनिष चव्हाण,मंचक चाफुले,बंडु उपाडे, बाळासाहेब मोकाशे छाया मोरे, गंगाबाई चिंतलगिरे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!