MB NEWS-*अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा* ---------------------------

 *अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा*

---------------------------



* परळी*( प्रतिनिधी ) 

विना अनुदानित व अंशत:अनुदानित शाळेचा दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदान मंजुर २० टक्के व वाढीव ४० टक्के चा निधी वितरणाचा आदेश तात्काळ काढावा व अघोषित सर्व शाळा कॉलेज निधीसह घोषीत करावे, या साठी शुक्रवार दि २९ पासुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे व आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असून या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकवटण्यासाठी सोमवार दि.२५ रोजी परळी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

        गेल्या २० वर्षापासुन होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड अजुन सुरूच आहे. १ सप्टेंबर २०१६ ला शासनाने २० टक्के अनुदान वितरित केले. परंतु टप्प्या टप्याने प्रचलित नियमानुसार अनुदान न देता गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक २० टक्के प्रमाणे आजही पगार उचलत आहे. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषीत असलेले सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंजूर झालेले अनुदान अद्यापही वितरीत न केले नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी शुक्रवार दि.२९ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षक कर्मचारी पुन्हा एकदा धडकणार असून या पार्श्वभूमीवर सोमवार दि.२५ रोजी परळी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचे र बीड जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश गित्ते यांनी सांगितले की, दि १३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत अनुदान मंजुर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा काँलेजचा २० टक्के व टप्पा वाढ शाळाचां ४० टक्के चा निधी वितरणाचा आदेश आपण सभागृहात वारंवार आश्वासित केल्या नुसार याच महिन्यात तात्काळ काढून वेतन सुरु करावे, मागील वर्षी दि २४ फेब्रुवारी २०२० ला अधिवेशनात मा अर्थमंत्री महोदयांनी पुरवणी मंजुर केली, त्यानंतर कोविड मुळे निधी वितरण केले नाही, बाकी कुणाचेच महाराष्ट्रात वेतन रोखले नाही पण आमचे मंजुर वेतन रोखून ठेवले, त्रुटी समिती नेमली, त्यानंतर १४ आँक्टोबर २०२० च्या कॅबिनेट ने १ नोव्हेंबर २०२० पासुन अनुदान देऊ केले, त्यानुसार तपासुन घोषीत केलेले शाळा,काँलेज पुन्हा तपासणी लावुन आपण बरोबर एक वर्ष बिनपगारी शिक्षकांना झुलवत ठेवलं,आधीच सर्व शाळा कॉलेज ह्या तपासुन घोषीत झालेल्या आहेत, व त्यांच अनुदान सभागृहात मंजुर आहे, तथा २०टक्के वेतन घेत असलेल्या शाळा पण चालु आहेत व त्यांच पण ४० टक्के अनुदान मंजुर आहे, तसा जि आर मधे निधीचे टोकन अर्थविभागाकडून टाकलेलं आहे.कुठल्याही शाळा काँलेजवर अन्याय होऊ न देता तात्काळ निधी वितरणाचा आदेश काढावा,तथा अघोषित सर्व शाळा कॉलेज निधीसह घोषीत कराव्यात, या मागण्यांसंदर्भात आपल्या कडून गेल्या १ वर्षापासुन आश्वासन व दिरंगाई शिवाय काहीच मिळत नसल्याने, विनाअनुदानित शिक्षक हवालदिल झाला आहे, लाँकडाऊन मधे २७ शिक्षक हार्ट अट्याक व आत्महत्या करुण मरण पावले आहेत, तरी आपण न्याय दिलेला नाही, नुसत अर्थखात शिक्षणखात्याकडे व शिक्षणखात अर्थखात्याकडे बोट दाखवुन वेळ मारून नेण्याचे काम करत आहे, या साठी नाईलाजास्तव कंटाळून पुर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. २९ पासुन आझाद मैदान मुबंई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सहभागी व्हावे असे प्रा. राजेश गित्ते शेवटी म्हणाले. 

              यावेळी प्रा. रमाकांत दराडे प्रा गोविंद जाधव प्रा रामेश्वर माले प्रा अशोक पवार प्रा बाबासाहेब नागरगोजे बाबासाहेब काळे प्रा योगेश सूर्यवंशी राम उबाळे, हरीभाऊ आघाव, नवनाथ घुगे, गौतम बारगजे आदींची उपस्थिती होती.


*प्रमुख मागण्या* :-

१) *१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत अनुदान मंजुर २०% व वाढीव ४०% वेतनाचा निधी वितरणाचा आदेश प्रचलित धोरणानुसार तात्काळ काढावा.*


२) *अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तात्काळ निधीसह घोषीत कराव्यात.*


३) *मेडिक्लेम व सेवा शर्ती लागु कराव्यात.*



*आँक्टोबर २०१६ मधे औरंगाबाद येथे मराठवाडा स्तरावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान हजारो मोर्चा काढणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर लाठीचार्ज केला. त्या नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०% अनुदान मंजूर केले. २६ आँगष्ट २०१९ रोजी आझाद मैदानावर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांवर लाठीचार्ज झाला व अनुदान पात्र यादी घोषित केली गेली. जर विनाअनुदानित शिक्षकांनी मार खाल्यानंतरच शासनाकडून काही प्राप्त होत असेल तर आम्ही आमचे हक्क मिळवण्यासाठी २९ जानेवारी २०२१ पासून आझाद मैदानावर येत आहोत.प्रसंगी हक्क मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आझाद मैदानावर सुमारे किमान २५ हजार विनाअनुदानित बांधव जमा होत आहोत.या वेळी समाधान करणारा शासन निर्णय हातात पडल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही* 

  *प्रा. राजेशगित्ते* (*समन्वयक,शिक्षक समन्वय संघ तथा बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना*)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !