इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" ! वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा

 औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" !



वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     मराठवाड्यातील ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर अभिषेक,पुजा करण्यास परवानगी मिळण्याची श्रद्धाळु भाविक भक्त व ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे अशा पुरोहित वर्ग,पुजा, अभिषेक साहित्य छोटे व्यावसायिक यांना प्रतिक्षा होती. औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या ठिकाणी अभिषेक अगोदरपासूनच सुरू झाले मात्र परळीत "अभिषेकबंदी" आहे.याबाबत आतावैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी मिळाली असुन यावर वैद्यनाथ देवल कमिटीच्या सकारात्मक निर्णयाची प्रतिक्षा आहे.

 


        कोरोना संकटात असलेले धार्मिक स्थळे तब्बल अकरा महिन्यानंतर उघडण्यात आले यादरम्यान मंदिरातील पुरोहित वर्ग तसेच बेल फुल विक्रेते आणि प्रसाद विक्रेते यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.दिवाळीच्या पाडव्याला मंदिर सुरू झाले पण अभिषेक आणि इतर पूजा बंद असल्याने संपूर्ण अर्थचक्र थांबलेले होते.याधीच मराठवाड्यात असलेल्या दोन ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अभिषेक ,पूजा नियम व अटी सह सुरू करण्यात आल्याचे समजते.मात्र बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ मंदिरात अद्यापही अभिषेक व पूजा करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतीत पुरोहित वर्गांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज केला होता त्याला उत्तर देत जिल्हाधिकारी यांनी वैद्यनाथ मंदिराच्या नीज गाभारा सोडून बाहेरील छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करण्याची परवानगी दिली असल्याचे आदेशात म्हटले आहे सदरील आदेश अप्पर जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्वाक्षरीत केलेला असून 21 जानेवारी रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.दरम्यान कोरोनाविषयक नियम,अटीसह अभिषेक सुरू करण्याबाबत देवल कमिटीने सकारात्मक निर्णय करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वैद्यनाथ देवल कमिटीच्या सकारात्मक निर्णयानंतर हे अभिषेक सुरू होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!