MB NEWS: *परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन नुतन कार्यकारिणी जाहीर:आशिष काबरा अध्यक्ष तर अक्षय भंडारी सचिव व कोषाध्यक्ष सुरज कोठारी*

 *परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन  नुतन कार्यकारिणी जाहीर:आशिष काबरा अध्यक्ष तर अक्षय भंडारी सचिव व कोषाध्यक्ष सुरज कोठारी* 



•_*विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा नुतन कार्यकारिणीचा निर्धार*•

परळी वैजनाथ / प्रतिनिधी. ....

       विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून सामाजिक जाणीव जागृत ठेवणारे संघटन म्हणून परिचित असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्षपदी युवा उद्योजक आशिष काबरा तर सचिवपदी  अक्षय भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

            बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन च्या माध्यमातून  विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलेले आहे.सामाजिक चळवळीत अग्रेसर परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन ची नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष पंकज तापडिया, जिल्हा सचिव तपन मोदाणी,परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे अध्यक्ष सचिन सारडा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे: अध्यक्ष - आशीष जी काबरा,उपाध्यक्ष- डॉ महेंद्र जाजु,महेश बजाज, अनूप सारडा ,अक्षय लड्ढा,सचिव- अक्षय भंडारी,सह सचिव- योगेश सोमानी, कोषाध्यक्ष- सूरज कोठारी,सह कोषाध्यक्ष- सचिन झंवर,संगठन मंत्री- सूरज बियाणी, आरोग्य मंत्री- शरद मानधाने,सांस्कृतिक मंत्री- सुमित नावंदर,प्रसिद्धि प्रमुख- सूरज भंडारी, राहुल भंडारी,क्रीडा मंत्री- गोविंद पोरवाल, व्यवसाय मंत्री- योगेश मल.

            दरम्यान विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्य करून,संघटनेला उंची वर नेण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष काबरा यांनी दिली.यावेळी कृष्णा साबू, कृष्णा लाहोटी, अजय भंडारी,पंकज भन्साळी, सुरेश पोरवाल, शैलेश चांडक,शरद भुतडा, पवन बंग,सुशील मुंदडा, सुमित लाहोटी, आशिष मंत्री,रमण भराडिया,अक्षय रांदड, रमण बजाज,अमित  रांदडराम जाजू, भूषण लाहोटी, अभिषेक बियाणी आदींसह पदाधिकारी, सदस्य,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !