MB NEWS- *अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी कार्यकारीणी जाहिर* तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे तर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी यांची निवड_

 *अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी कार्यकारीणी जाहिर*



तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे तर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी यांची निवड_ 


 


परळी (प्रतिनिधी)


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेची नुतन कार्यकारीणी निवडण्यासाठी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, तर शहराध्यक्षपदी दै.गावकरीचे तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे तर दै.झुंजार नेताचे तालुका प्रतिनिधी अनंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तालुका सचिवपदी स्वानंद पाटील तर शहर सचिवपदी प्रा.प्रविण फुटके यांची निवड करण्यात आली. निवडीची सर्व प्रक्रिया समन्वयक धनंजय आरबुने यांनी पार पाडली.


साथी सभागृह येथे आज दि.२४ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे व जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर व जिल्हा कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली परळी शाखेची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपादक सतिष बियाणी, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, प्रशांत प्र.जोशी, संपादक आत्मलिंग शेटे, मोहन व्हावळे, ओमप्रकाश बुरांडे, प्रा.रविंद्र जोशी, प्रकाश चव्हाण,बालासाहेब फड, विश्वास महाराज पांडे, नरसिंग अन्नलदास आदी जेष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी झाल्या. नविन कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, तालुका सचिव स्वानंद पाटील, शहर सचिव प्रा.प्रविण फुटके, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चोपडे, दिगंबर देशमुख, कोषाध्यक्ष बालकिशन सोनी, संघटक श्रीराम लांडगे, सोशल मीडिया सेल महादेव शिंदे, संभाजी मुंडे, कायदेशिर सल्लागार ॲड.आर.व्ही.गित्ते, ॲड.पी.एम.साताई, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ.राजाराम मुंडे यांची निवड करण्यात आली. उर्वरित पदांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. नवविर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नविन पदाधिकाऱ्यांचे अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस.एम.देशमुख व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या बैठकीस अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार