MB NEWS- *कोविडविषयक नियमावलीच्या अधिन राहून होणार ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अभिषेक सेवा !*

 *कोविडविषयक नियमावलीच्या अधिन राहून होणार ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अभिषेक सेवा !*





_श्री वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून पुरोहीत, जंगम यांना छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक पुजेची परवानगी_


💢 अभिषेक, पुजेसाठी अशा असणार अटी व शर्ती......💢 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       श्री वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून पुरोहीत, जंगम यांना छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करण्यास खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.


१. छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करतेवळी कमीत कमी सर्वांत ०६ फुट शारिरिक अंतर राखणे बंधनकारक राहील.

२. चेहरपट्टी/मास्क यांचा वापर करणे बंधनकारक राहील.

३. अभिषेक पूजेस बसण्यापुर्वी साबणाने हात धुणे बंधकारक असेल त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

४. अभिषेक पूजेच्या नंतर ज्या अनावश्यक वस्तू असतील त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे संबंधिताची जबाबदारी असेल. 

५. या ठिकाणी येणारया पुरोहीत व इतर यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल.

 ६. अभिषेक पुजेच्या ठिकाणी हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसरची सोय करावी.

৬. सदर ठिकाणी केवळ कोणतेही लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्रवेश असले. च चेहरापट्टी/मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी असेल. 

८. सदर ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा या बाबत विश्वस्त व तहसिलदार यांनी निर्णय घ्यावा.

९. अभिषेक पूजेवेळी बसतांना सामाजिक अंतर पाळावे. अभिषेक पूजेदरम्यान मुर्तीस स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही,

१०. मोठ्या प्रमाणात गर्दी किंवा जमाव जमविण्यास परवानगी असणार नाही. छोट्या महादेव पिंडीवर अभिषेक करतेवेळी पूरोहीत यांच्यासह केवळ चार व्यक्तीस मुभा असेल.

११. एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळावा तसेच चटई/सतरंजी यांचा यापर सामूहीकपणे करण्यास पस्यानगी असणार नाही, 

१२. प्रसाद वितरण किवा पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या बाबींना परवानगी असणार नाही.

१३. अभिषेक पुजेच्या परिसरात वारंवार साफसफाई व निर्जतुर्कीकरण नगर पालिका प्रशासन व विश्वस्त कमिटीने करणे बंधनकारक असले. १४. सदर टिकाणी कोविड विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यास त्वरीत सर्व परिसरात निर्जतुकीकरण करण्यात यावे.

१५. या कार्यालयाचे संदर्भ क्र. २ व ३ च्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे विश्वस्त व पुरोहीत यांना बंधनकारक राहील. 

१६. या कार्यालयाचे संदर्भ क्र. २ च्या आदेशासोबतील परिशिष्ठ अ प्रमाणे धार्मिक स्थळ/प्रार्थना स्थळ या ठिकाणी होणारा कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक सूचना यांचे पालन करणे विश्वस्त व पुरोहीत यांचेवर बंधनकारक राहील.

१७. या कार्यालयाचे संदर्भ क्र. २ च्या आदेशासोबतील परिशिष्ठ अ प्रमाणे धार्मिक स्थळ/प्रार्थना स्थळ या ठिकाणी होणारा कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक सूचना यांचा भंग झाल्यास पोलीस प्रशासन व नगर पालिका प्रशासन हे जबाबादार राहतील. मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक सूचना यांचा भंग होणार नाही त्याअनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही पोलीस प्रशासन व नगर पालिका प्रशासन यांनी करावी.

१८. सदरील परवानगी ही या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत अंमलात असेल. पुढील आदेशानंतर सदरील परवानगी आपोआप संपुष्टात येईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार