MB NEWS-शरद पवार म्हणाले, 'धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही'

 शरद पवार म्हणाले, 'धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही'



"सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही. वाटलं तर या प्रकरणाची चौकशी होऊ द्या. सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे", असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून आज त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांनी त्यांना धनंजय मुंडेंच्यावरील बलात्काराच्या आरोपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिले. पवार पुढे म्हणाले की, "काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. हवंतर प्रकरणाची चौकशी होऊ द्या. त्यात धनंजय मुंडे दोषी आढळले, तर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत", असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले. 

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप केलेले होते. त्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजपने राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत राजीनाम्याची मागणी केली होती.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !