MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये* *छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!*

 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये


छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!


परळी /प्रतिनिधी


अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध कारकिर्दीत सर्व धर्म समभाव दृष्टिकोण जोपासला असे प्रतिपादन ऍड मनोज संकाये यांनी केले.



    छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली त्यांच्या धर्माची तत्वे यांचे रक्षण करण्याचे काम केले आणि प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे असे ते म्हणत आपल्या स्वराज्यात मज्जिद बांधणारा राजा म्हणून त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये तर त्यांच्याप्रती समभाव दृष्टिकोन जोपासावा असे ऍड मनोज संकाये यांनी सांगितले.


    या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे ,विवेक दांडगे ,मुंजाभाऊ गरड ,दीपक शेटे , अनिल चौधरी ,सोमनाथ दौंड ,मुन्ना चव्हाण ,बालासाहेब गुट्टे ,ज्ञानदेव आंबुरे ,राम चाटे ,विलास गिते, वाघा रोडे ,सुंदर आव्हाड, नाना अचारे ,कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे ,संजय पाटील, दगडू भाळे , सोहेल तहीत आदीसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !