MB NEWS-सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प* पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत*

 *सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प*



पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत* 


मुंबई। दिनांक ०१।

कोरोना नंतर आलेले संकट लक्षात घेऊन आरोग्य, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा यासह सर्व क्षेत्रांना उभारी देणारा आणि सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


   कोरोनाच्या महा भयानक संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे, कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद यात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबरोबरच शेती व उद्योग क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यावर यात भर देण्यात आला आहे. शेती मालाला दीडपट भाव, हमी भावाने खरेदी, मजूरांसाठी अन्न सुरक्षा योजना, रस्ते, लहान सिंचन प्रकल्प, लघुउद्योग, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण पायाभूत योजना आदी विविध क्षेत्रांसाठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, एकूणच या अर्थसंकल्पाने शेती, उद्योगांसह सर्व सामान्यांच्या हिताचा विचार केला असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !