इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे -मल्लिकार्जुन प्रसन्ना* *औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट*

 *पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे -मल्लिकार्जुन प्रसन्ना*



*औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट*


 परळी वैजनाथ ता.०२ (प्रतिनिधी)

         औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शहरातील संभाजी नगर पोलीस ठाण्यास मंगळवारी (ता.०२) भेट देवून तपासणी केली.

                      औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. यावेळी संभाजी नगर पोलीस ठाण्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान सर्व अद्यावत रेकाँर्ड पाहून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी पोलीसांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे. तसेच वेळेवर कर्तव्य बजावले पाहिजे, पोलीसांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने हाताळून कायदा व सुव्यवस्था जोपासने गरजेचे असल्याचे सांगितले. या दौऱ्यात पोलीस अधिक्षक आर राजा, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय,संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके यांच्यासह दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

-----------------------------------

दरम्यान औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी येथे संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट दिली असता पत्रकारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकार प्रा.प्रविण फुटके, भगवान साकसमुद्रे, संतोष जुजगर, बाबा शेख, बालाजी ढगे, प्रा.दशरथ रोडे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट