MB NEWS-रेवली येथील भाजप कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश रेवलीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा ना. मुंडेंच्या हस्ते सत्कार

 रेवली येथील भाजप कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

रेवलीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा ना. मुंडेंच्या हस्ते सत्कार

परळी (दि. 19) ---- : परळी तालुक्यातील रेवली येथील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गमजा घालून सर्वांचे स्वागत केले. 

रेवली येथील श्यामराव कांदे, उत्तम राठोड, नामदेव राठोड, वसंत पवार, पापा राठोड, पापा गणपती राठोड, धोंडीराम राठोड, हरिभाऊ राठोड, बळीराम शिंदे, शिवाजी उपाडे, मधुकर मुंडे, विठ्ठल कांदे, विठ्ठल पंडित, गणेश शिंदे, शहानिक अनुसे, महादेव उपाडे आदींचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी ना. मुंडे यांच्या सह न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, राष्ट्रवादीे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, तालुका समन्वय समिती अध्यक्ष सुर्यभान मुंडे, नगरसेवक दीपकनाना देशमुख, संजय गांधी निराधार समिती तालुका अध्यक्ष राजाभाऊ पौळ, भाऊसाहेब कराड, प्रभाकर पौळ यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान रेवलीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रेखाताई मनोहर केदार, उपसरपंच सौ. शकुंतला कवडे, मनोहर केदार, वैजनाथ कांदे, किसन कांदे, अण्णासाहेब मोटे, रतन कवडे, उत्तम उपाडे, शेषेराव बनसोडे, ज्योतिराम कांदे आदी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा ना. मुंडे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. गटतट बाजूला ठेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने काम करा, अशा शुभेच्छा यावेळी ना. मुंडेंनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार