MB NEWS-पोलवर करंट उतरुन सहा वर्षीय मुलीचा मृत्यू ; हयगयीने मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा वीजवितरण विरुद्ध गुन्हा दाखल

 पोलवर करंट उतरुन सहा वर्षीय मुलीचा मृत्यू ; हयगयीने मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा वीजवितरण विरुद्ध गुन्हा दाखल





परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      

       पोलवर करंट उतरुन एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना काल दिनांक 9 रोजी दुपारी 03 च्या सुमारास घडली. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते. वारंवार सांगूनही करंट उतरणाऱ्या पोलची दुरुस्ती केले नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला होता.याप्रकरणी मयत मुलीचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीजवितरण विरुद्धहयगयीने मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याच (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      वीजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले. मात्र ही दुरुस्ती केली नसल्याने अतिशय दुर्दैवी घटना घडली.गौरी वैजनाथ घोटकर,वय ६ वर्षे ही मुलगी या खांबाला संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला.या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची चीड नागरिकांनी व्यक्त केली. तसेच मृतदेह स्विकारण्यास नकार दिला.याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

      मयत मुलीचे वडील वैजनाथ विठ्ठलराव घोटकर यांच्या फिर्यादीवरून वीजवितरण विरुद्धहयगयीने मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अधिक तपास पो.उपनि.मोहन जाधव हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार