MB NEWS-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा : घाबरू नका...गांभीर्य बाळगा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

 कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा : घाबरू नका...गांभीर्य बाळगा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी----

        प्रशासन व आरोग्य विभागाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो.नागरीकांनी भीती बाळगू नये, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क,सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

         जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा सेकंड व्हेवमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी अकारण प्रवास करू नये,गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे व सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळे आदी ठिकाणी गर्दी टाळावी, बाहेर वावरताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत,हात स्वच्छ असल्याशिवाय कान, नाक,डोळे,यांना स्पर्श करू नये,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा.तसेच लहान मूल,वयोवृद्ध व गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्यात यावी.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी  प्रशासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार