MB NEWS- *पंकजाताई मुंडे, खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश !* *परळीच्या भाविकांना आता रामेश्वरमलाही जाता येणार ; तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन गुरूवारी वैद्यनाथाच्या भूमीत*

 *पंकजाताई मुंडे, खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश !*



*परळीच्या भाविकांना आता रामेश्वरमलाही जाता येणार ; तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन गुरूवारी वैद्यनाथाच्या भूमीत* 


परळी । दिनांक १५ ।

शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आता श्रीक्षेत्र रामेश्वरमलाही रेल्वेने जाता येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन रेल्वे मंत्रालयाने वैद्यनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत विस्तारित केली आहे. येत्या १८ तारखेला पहाटे म्हणजे गुरूवारी हया स्पेशल ट्रेनचे परळीत आगमन होणार असून भाविकांत आनंद व्यक्त होत आहे.


    परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आयआर सीटीसी ने ज्योतिर्लिंग यात्रा सुरू केली असून त्यासाठी विविध ठिकाणांहून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. सुरवातीला या यादीत परळी ज्योतिर्लिंगाचा समावेश नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांना भेटून ही स्पेशल ट्रेन परळी पर्यंत आणावी अशी मागणी केली. खासदार डाॅ. प्रीतमताई यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले तर पंकजाताई यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन या यादीत परळीचा समावेश करण्याची मागणी केली होती, त्यांच्या या पाठपुराव्या नंतर रेल्वे मंत्रालयाने हया विशेष ट्रेनला परळीपर्यंत परवानगी दिली.


*गुरूवारी येणार स्पेशल ट्रेन ; परळीत नऊ तास थांबणार !*

-------------------------

दक्षिण मध्य रेल्वेची ही तीर्थक्षेत्र यात्रा विशेष रेल्वे गाडी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१० वा. राजकोट (गुजरात) येथून निघून १६ ला दुपारी २ वा. नाशिक रोड, १७ तारखेला संध्याकाळी ७.३० वा. औरंगाबाद आणि १८ तारखेला पहाटे ४ वा. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे येणार आहे. परळी येथे नऊ तास ही रेल्वे थांबणार असून त्यानंतर दुपारी १ वा. परळी येथून निघून २० तारखेला ही रेल्वे श्रीक्षेत्र रामेश्वरम येथे पोहोचणार आहे. स्पेशल ट्रेन सुरू केल्याबद्दल शहरात आनंद व्यक्त होत असून भाविक भक्त व प्रवाशांनी पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !