प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-डिग्रस बंधाऱ्यातील शेतजमिनीचा मावेजा मिळावा यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा

 डिग्रस बंधाऱ्यातील शेतजमिनीचा मावेजा मिळावा यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा




गंगाखेड, प्रतिनिधी 

दिग्रस बांधारा होऊन अनेक वर्षे उलटले असून सुद्धा डिग्रस बंधाऱ्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा शासनाने अध्यापही शेतकऱ्यांना दिलेला नाही. स्थानिक गावातील लोकांनी शासनाला वेळोवेळी अनेक वेळी उपोषणे आंदोलने केली या उपोषण आंदोलने याची दखल सुद्धा प्रशासन घेत नसल्याकारणाने प्रसाद पौळयांच्या नेतृत्वात मागील 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपोषण करण्यात आले होते त्या जिल्हाधिकारी साहेब यांनी लेखी आश्वासन दिले कि मावेजा दिले जाईल अद्याप पर्यंत ही मावेजा ची कारवाई सुरू झाली नसल्याकारणाने प्रसाद पौळ यांनी आज दिनांक 16/02/2021रोजी अल्पसंख्याक व पालक मंत्री नवाब मलिक साहेब यांच्या हस्ते शासनाला पाठपुरावा करण्यात आला डिग्रस बंधाऱ्यातील गेलेल्या शेतजमीन  मावेजा लोकांना मिळावा शासन दरबारी पाठपुरावा सुरूच आहे या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने तात्काळ मावेजा वाटप करावा अन्यथा येणाऱ्या काळात पुन्हा मनोदय उपोषण करण्याची वेळ येऊ नये व प्रशासनाने तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी शेतकऱ्यांतून बोलले जाते सविस्तर वृत्त असे की पालम तालुक्यातील दिग्रस उच्च पातळी बंधारा यातील शेतजमिनी बॅक वॉटर खाली गेलेल्या संपूर्ण क्षेत्रफळाचा काही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही उर्वरित काही शेतकरी मावेजा पासून वंचित राहिलेले आहेत हे शेतकरी बरेच दिवसापासून शासन दरबारी की दरबारी खेटे मारत आहेत नांदेड प्रशासन व परभणी प्रशासन भूसंपादन प्रक्रिया या दिग्रस उच्च पातळी बंधारा याची असून या पाटबंधारे विभागाचे कार्यालय नांदेड येथे आहे या विभागाकडे पण मागील काळी प्रत्येक वेळी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा तात्काळ मावेजा वाटप करा अशा मागणीचे अनेक वेळा निवेदन देण्यात आलेले होते 2011 पासून सतत निवेदनाद्वारे मागणी होत असून 2018 मध्ये काही शेतकऱ्यांना मावेजा फरकंडा येथील मिळालेला असून त्यातील उर्वरित क्षेत्रफळाचा मावेजा मिळालेला नाही अद्यापही वंचित राहिलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी  व कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला वाटप करावा असे शेतकर्‍यांच्या वतीने कळवले जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या