इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल"

 पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया



म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल"


मुंबई....

          पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षानं हा मुद्दा उचलून धरला आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अखेर या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवडी येथे ट्रान्सहार्बर कामाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


तसंच, 'या बद्दल सखोल चौकशी केली जाईल पण, गेले काही दिवस काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणले जाईल,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!