MB NEWS-स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार विविध उपक्रमांचा शुभारंभ

 स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार विविध उपक्रमांचा शुभारंभ



मराठवाडा साथी क्लिनिक, मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र, माझा आवाज तसेच आरोग्य मित्र हेल्प डेस्क होणार स्थापित


परळी । प्रतिनिधी

दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांचा येत्या शनिवारी स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचा शुभारंभही करण्यात येत असुन, ज्यामध्ये जनतेच्या समस्या मांडण्यासाठी माझा आवाज उपक्रम, हेल्प डेस्कद्वारे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र, मराठवाडा साथी क्लिनिक तसेच उपजिल्हा रूग्णालय येथे रूग्णांच्या तांत्रीक मदतीसाठी आरोग्य मित्र हेल्प डेस्क स्थापन करण्यात येणार आहे. दै.मराठवाडा साथी सभागृहात स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमातच या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

शनिवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी दै.मराठवाडा साथीच्या वतीने विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. परळी शहरातील नागरीकांच्या शासकीय कार्यालयांशी निगडीत सार्वजनिक समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासनापर्यंत लेखी पोचवण्यासाठी माझा आवाज उपक्रम सुरू करण्यात येतो आहे. याच तक्रारींना दै.मराठवाडा साथी पेपरच्या माध्यमातूनही प्रकाशित करण्यात येणार आहे. मराठवाडा साथी कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला असून, तेथील प्रतिनिधी नागरीकांच्या तक्रारी नोंदवून घेणार आहेत. याच कक्षामध्ये ॲड.संजय रोडे यांच्याकडून कायदेशिर सल्लाही नागरीकांना देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहीती मिळविण्यासाठी ॲड.संजय रोडे – 7972979128 तसेच माझा आवाज उपक्रमाबाबत विशाल रोडे – 9307859357 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रूग्णांच्या सेवेसाठी दोन उपक्रमही यानिमित्ताने सुरू करण्यात येत आहेत. परळी उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या ग्रामिण भागातील तसेच शहरातील रूग्णांना बऱ्याच विभागांची माहीती नसते. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत हवी ती माहीती रूग्णांना देवून त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी आरोग्य मित्र हेल्प डेस्क उभारण्यात येत आहे. ज्याद्वारे रूग्णांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व त्यांच्या समस्यांवर त्यांना योग्य ती मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी शहरातील रूग्णांची तपासणी व वैद्यकीय सल्ला केंद्रही मराठवाडा साथी क्लिनिकच्या माध्यमातून स्थापन करण्यात आले आहे. हे क्लिनिक स्थापन केल्याने वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. डॉ. ज्ञानेश्वर लक्ष्मण ढाकणे B.A.M.S., E.M.S.(रुबी हॉल, पुणे), डॉ. सौ. दिपा ज्ञानेश्वर ढाकणे B.A.M.S. (औरंगाबाद) हे दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ८ या वेळेत रूग्णांना वैद्यकीय तपासणी व औषधांबाबत सल्ला देणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !