MB NEWS-दिशाभूल करून मनोरा टॉवर उभारणी ; शेतकऱ्याचा आक्षेप परळी

 दिशाभूल करून मनोरा टॉवर उभारणी ; शेतकऱ्याचा आक्षेप



परळी -शहरा जवळील जलालपूर येथील सर्व्हे नंबर पाच मध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करून महापारेषण कंपनीच्या कार्यकारी अभियंता , गिरवली ता आंबा जोगाई वतीने परळी -गिरवली वाहिनीसाठी मनोरा टॉवर उभारणी व उच्च दाब विद्युत वाहिनीच्या तारा ओढण्यात येत आहे .यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत ला असून याप्रकरणी परळीच्या उपजिल्हाधिकारी कडे मावेजा साठी तक्रार दाखल केली आहे अशी माहिती तेजस रमेश देशमुख ,नागोराव बापूसाहेब देशमुख यांनी मंगळवारी दिली. 220 के.व्ही परळी वैजनाथ- गीरवली वाहिनी व 132 के.व्ही परळी -गिरवली वाहिनीसाठी मनोरा व्याप्त क्षेत्र व मनोरा तारा गेल्याने व तारेने व्याप्त क्षेत्र हे जलालपूर येथील आमच्या मालकीच्या ताब्याच्या जमिनीमध्ये येत असून या क्षेत्राबाबत जमिनीची करण्यात आलेली मोजणी व त्याबाबतचे मूल्यांकन बाबत आक्षेप असल्याचा अर्ज उपविभागीय अधिकारी परळी त्यांच्याकडे तेजस देशमुख, नागोराव देशमुख, अभिजीत देशमुख, सूनील देशमुख रां नेहरू चौक परळी यांनी दिला आहे .या अर्जात देशमुख यांनी असे पुढे म्हटले आहे की, महापारेषण कंपनी ने जमीन मालकास पूर्वसूचना न देता जवळपास 60 ते 70 टक्के काम जानेवारी 2020 मध्ये पूर्ण केले आहे 28 नोव्हेंबर 2019पासून आज पर्यंत सदर कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून व खोटे आश्वासन देऊन काम केलेले आहे महापारेषण कंपनी च्या आधी कारि यांनी सर्व्हे केलेल्या प्लेन प्रमाणे पाठपुरावा न करता त्यांना वाटेल त्या योग्य जागेत मनोरा उभारण्याचे प्लॅनमध्ये बदल करून उच्च दाब विद्युत तारा ओढण्याचे काम करत आहे .सदर कंपनीमार्फत सर्वे नंबर 5 /1, व 5/2 ची झालेली मोजणी अर्धवटच झालेले असून या मोजणी मध्ये तारे खाली जमीन क्षेत्रफळ ग्रहित धरलेले आहे तारे मुळे बाधित झालेले क्षेत्र गृहीत धरलेले नाही याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये डब्ल्यू पी एस टी 3322/ 20 21 रिट पिटीशन तेजस देशमुख व इतर जमीन मालकांनी दाखल केली असतानाही सदर कंपनीने पोलीस प्रोटेक्शन साठी अर्ज केलेले आहे सर्वे नंबर पाच मध्ये म जमीन मालकाची दिशाभूल करून काम करन्याचा प्रयत्न होत आहे. महापारेषण कंपनीने राईट ऑफ वे च्या नियमाप्रमाणे तारे शेजारचे 132 केव्ही उच्चदाब वाहिनीसाठी 27 मीटर व 220 केव्ही उच्चदाब वाहिनीसाठी 35 मीटर बाधित क्षेत्र गृहीत धरूनच फेरमोजणी करावी व शेतकऱ्यांचे नुकसान न करता महापारेषण कंपनीने शेजारच्या सर्वे नंबर दोन ला मिळालेला भाव दर तीन हजार 900 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे सर्वे नंबर 5/1, व पाच / 2 चे मूल्यांकन करून महापारेषण कंपनी ने जमीन संपादित करून वरील प्रमाणे मावेजा दिल्यावर काम सुरू करावे अशी मागणीही तेजस देशमुख यांनी केली आहे.. " सरकार च्या कामात अडथळा निर्मान करण्याचा कसलाच ऊद्देश नाही.आम्हास शेतकर्यंवर अन्याय न हाऊ देता अम्हास शेतक र्याना नियमा प्रमाणे योग्य मावेजा भेटण्यास सहकार्य करावे व. महापारेषण कंपनी ने आमच्या जागेत जबरदस्ती चे काम थांबवावे व कंपनी वर कार्यवाही करावी, " -तेजस रमेशराव देशमुख परळी याप्रकरनी महापारेषण कंपनीचे परळीतील अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की महापारेषण कंपनीच्या वतीने त्यांना योग्य तो मोबदला देणार आहोत,जमीन मालकाची पूर्व परवानगी घेऊनच काम सुरू केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !