MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये* *ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार*

 *वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये*



*ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार* 


_गळीत हंगाम जोमाने सुरू ; शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण !_


परळी । दिनांक ०३। 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २ हजार रूपये बॅकेत वर्ग केले आहेत. वेळेवर पैसे मिळाल्याने आनंदित झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमाने सुरू असल्याने शेतकऱ्यांत मोठा उत्साह जाणवत व आहे. 


    यंदा कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या परंतू त्या सर्व अडचणींवर मात करून कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केवळ आणि केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले आणि कारखाना सुरू केला. १६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गळीत हंगामास सुरवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४६ दिवसात कारखान्याने एक लाख ३८ हजार मे टन ऊस गाळप केला असून एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. सध्या तीन हजार ८०० मे टन दैनंदिन क्षमतेने कारखाना ऊस गाळप करत आहे. कारखान्याच्या आवारात सध्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक, ट्रॅक्टर, बैलगाड्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.


*पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदले*

--------------------------------

गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ३१ डिसेंबर अखेर ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलापोटी प्रति टन २ हजार रुपये कारखान्याने त्यांच्या बॅक खात्यात वर्ग केले आहेत. ऐन गरजेच्या वेळी पैसे मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून परळीची बाजारपेठ फुलून गेली आहे. ऊसाचे बिल दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

  1. यात पंकजा चे आभार मनासारखे काय त्यांनी पैसे का फुकट दिलेत का शेतकऱ्याचे पैसे होते ते त्यांच्या मालाचे पैसे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !