MB NEWS-मयत अनोळखी वृद्ध इसमाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

 मयत अनोळखी वृद्ध इसमाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन 



परळी l प्रतिनिधी

परळीतील संत जगमित्र नागा मंदिरच्या बाजूला एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र त्याबाबत कुठलीच माहिती प्राप्त होत नसल्याने संबंधित मयत इसम कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. संबंधिताचे वर्णन प्रसिद्धीस देण्यात आले असून मुतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यासीन कासीम सय्य्द वय 36 वर्षे व्यवसाय मजुरी रा.आयशा कॉलनी परळी यांनी पोस्टेला खबर दिली की, दि. 09/02/2021 रोजीदुपारी 14.30 वा जगमित्रनागा मंदिर समोरील रोडचे बाजुला असलेल्या नाली लगत अनोळखी मयत इसम हा वयोवद्ध झाल्याने जगमित्रनागा मंदिर समोरील रोडचे बाजुला असलेल्या नाली लगत मयत आवस्थेत मिळुन आल्याने त्यांनी पोस्टेला खबर दिल्याने त्यांचे खबरी वरून पोस्टे परळी शहर अ.म.नं 04/2021 कलम CRPC 174 प्रमाणे आ.मृ.दाखल आसुन आ.मृ.चा तपास आम्ही करीता आहोत. सदर मयत आनोळखी आसल्याने मयताचे नातेवाईकांचा ताबे पोलीसा मार्फत शोध होऊन ईकडील पोस्टेस कळविणेस विनंती आहे असे आवाहन परळी शहर पोलिसांनी काढलेल्या शोधपत्रिकेत केले आहे. जर कोणी त्या मयतास ओळखत असेल तर त्यांनी पोना पी.ए. क्षीरसागर मो.नं 88888865520 तसेच पो.स्टे परळी शहर फोन नं 02446222036 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार