परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रने संपन्न*

 *भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रने संपन्न*



परळी (प्रतिनिधी) - : परळी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त प्रबोधन आत्मक गाण्याच्या ऑर्केस्ट्राचे त्रिरत्न बुद्ध विहार महिला मंडळ, भिमवाडी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रोडे चौक येथे प्रबोधनात्मक गाण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्रिरत्न बुद्ध विहार महिला मंडळ ,भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 प्रबोधनात्मक गाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रमाईच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकणारा राहुल सूर्यवंशी प्रस्तुत भिमक्रांती ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले.  


हजारो वर्षांपासून होत असलेल्या, अन्याय-अत्याचाराला प्रतिकार करणारे योद्धे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांन कडे बघितलं जातं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून; बहुजन समाजातील लेकरा बाळांचीच, बाबासाहेबांची सुद्धा तेवढीच काळजी घेत रमाईने बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली. रमाईच्या जीवन कार्यावरील गीते सादर करण्यात आले. शहरातील विविध भागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने या प्रबोधनात्मक गाण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

बुद्ध भीम गीते सादर केली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!