प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-अवैध वृक्षतोड थांबवा अन्यथा आंदोलन- मनसेचा इशारा

 अवैध वृक्षतोड थांबवा अन्यथा आंदोलन- मनसेचा इशारा 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

 परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड होत असून ही अवैध वृक्षतोड थांबवावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.



     अवैध वृक्षतोडीवर बंधन घालावे व आवश्यक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय दहिवाळ यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात परळी तालुक्यातील अवैध वृक्षतोड थांबवा अवैध वृक्षतोड वाहतुकीवर निर्बंध घाला व पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर याबाबत कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या