MB NEWS-गंगाखेड:पूर्व परवानगीची नव्याने घातलेली अट काढा- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

 पूर्व परवानगीची नव्याने घातलेली अट काढा- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन


गंगाखेड ,प्रतिनिधी...

    विद्यापीठांमध्ये घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संवाद परिषदांच्या पूर्व परवानगीची नव्याने घातलेली अट काढा अशी मागणी करणारे निवेदन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

    भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद , परिसंवाद ,चर्चासत्र, आयोजित करायचे असेल ,तसेच त्यात समाविष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, संशोधन ,राजकारण , अर्थकारण इत्यादी विषयातील जगप्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग आणि मार्गदर्शन यांचे आयोजन करण्याबाबत संपूर्ण भारत देशातील विद्यापीठांना , परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करणारा ,ईशान्य भारतातील राज्य , जम्मू- काश्मीर , लडाख या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदा घेण्याला पूर्णपणे बंदी घालणारा निर्णय घेतला आहे.

          वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद(VBVP) च्या वतीने या निर्णयाचा निषेध करण्यात आला असून हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या वेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे सचिव शिवश्री अर्जून चव्हाण, उपाध्यक्ष प्रसाद धापसे, कार्याध्यक्ष विकास राठोड, सहकोषाध्यक्ष अमित बोबडे, प्रवक्ता श्रावण चौधरी, प्रसिद्धी प्रमुख वेदांत भिसे, गजानन सायकर ,अनिल बोबडे ,मारोती ,रहमान शेख, मुंजाजी बोबडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !