MB NEWS-*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे आवश्यक -धनंजय आरबुने*

 *छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारआचरणात आणणे आवश्यक -धनंजय आरबुने*



परळी,(प्रतिनिधी):-

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व प्रेरणेतून ध्येयवादी प्रेरित होऊन त्यांचे विचार आचरणात आणले तर आपणही आजचा शिवाजी बनून समाजासाठी योगदान देऊ शकू यात काही शंकाच नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने यांनी केले.

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साथी सभागृहात दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वा.अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाडा साथी चे संपादक तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियाणी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, कार्याध्यक्ष आनंत कुलकर्णी, सोशल मीडिया प्रमुख महादेव शिंदे, अनिल गायकवाड, शुभम चव्हाण, तुकाराम कराळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यानी केले तर आभार शहराध्यक्ष जगदीश शिंदे यानी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !