इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-प्रा.डाॅ.माधव रोडे होणार परळी भूषण पुरस्काराने सन्मानित !

 प्रा.डाॅ.माधव रोडे होणार परळी भूषण पुरस्काराने सन्मानित !

   ------------------------------------------

💢 अभ्यासु,परखड,संघर्षशिल, सामाजिक क्षेत्रातील 'टायगर' तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व : प्रा.डाॅ.माधव रोडे-

--------------------------------------

परळी वैजनाथ, प्रतिनिधी- 

          दै.मराठवाडा साथीच्या वतीने शैक्षणिक सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना परळी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सर्व परिचित अभ्यासु, परखड,संघर्षशिल, सामाजिक क्षेत्रातील 'टायगर' तथा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा.डाॅ.माधव रोडे यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



   • प्रा.डाॅ.माधव रोडे यांच्या विविध कार्याचा अल्पपरिचय •

 • प्रा. डॉ.माधव नामदेव रोडे,

वैद्यनाथ कॉलेज, परळी- वैजनाथ

पत्ता:-माणिक नगर, परळी वैजनाथ जि. बीड


• संशोधक:-भौतिकशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद


•भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भौतिकशास्त्रचे पुस्तक आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहा पुस्तके प्रकाशीत १२५ संशोधन पेपर सादर

•महात्मा फुले फाउंडेशन समन्वयक,

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा वर उत्कृष्ट लेखना करणारे लेखक

• २५ गोरगरिब आर्थिक दृष्टया दुर्बलचे विद्यार्थीनचे पालकत्व घेतले त्यातील १० मुले व ५ मुली शासकीय

सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत

.•स्वाभिमानी मुप्टा- प्राध्यापक संघटनेचे मराठवाडा समन्वयक

• पथनाटयतून जनजागृती करणारा क्रांतीकारक गुण गौरव

• महाराष्ट्र राज्य तील उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून दोन वेळा पुरस्कार मिळाला

• २० गावात वर्षातून १० दिवस मुक्कामी शिबिरातून तरुणांना प्रबोधन, विवेक संवर्धन मागील १५ वर्षापासून सुरूच

• २५ वेळा रक्तदान केले

• निरोगी आरोग्यचा मंत्र सुखाचा उपक्रमातून तीनेश (३००) जेष्ठ नागरिकांनाच्या आयुष्यातील सकारात्माक मानसिकतून आनंदी जीवन प्रभावी कार्य

•पाच वर्षापासून जागर शिक्षणांचा जागर माणूसकीचा उपक्रम राबऊन ५००० मुलींना सहभाग

• सावित्री-ज्योती, रामा - भीमा विचारांचे प्रबोधन स्वखर्चाने राबवितात.

•रयत शिवबाची जनजागरण उपक्रम

•जलसंवर्धन - वृक्षसंवर्धन कृती कार्यक्रम

•जेष्ठ नागरिक आरोग्य मालिश उपक्रम

•भारतीय संविधान जन जागृती अभियान व्दारा ५० ठिकाणी कार्यक्रमात व्याख्यान दिले

• संपादक, पत्रकार, लेखक, प्रबोधन -वाचन हा छंद

•तथागत भगवान बुध्द धम्म - महानाटय तून प्रबोधन कार्यक्रम आयुष्यतील ध्येय

•स्वामी विवेकानंद विचार समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य

•नात्यातील शांतता टिकली पाहिजे, वाचन चळवळ, प्रश्न तुमचे उत्तर आमचे युवा संवाद, लक्ष्य अवघड

असले तरी अशक्य नसते उपक्रम राबविले.

           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!