MB NEWS-रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी

 रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे 



लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी 


परळी (प्रतिनिधी) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असून त्यांना अभिप्रेत असलेले कार्य मराठा-बहुजन युवकांनी करावे असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक तथा पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे ३९१ व्या शिवजयंती निमित्त बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडूकटले, दत्ता लांडे, विजय देशमुख, पत्रकार अमोल सूर्यवंशी, हर्षद शिंदे उपस्थित होते. 


साकसमुद्रे पुढे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुलेंनी दि.१९ फेब्रुवारी १८६९ रोजी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व रायगडावर जगात प्रथमच शिवजयंती उत्सव सुरु केला. प्रबोधनकार ठाकरें म्हणत शिवाजी महाराजांच्या नावापुढे ३३ कोटी देवांची पलटण बाद होते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शिवबांना वंदन करून करत असत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढून शिवाजी महाराजांचे कार्य पुढे न्हेले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर बदलापूर येथे झालेल्या ३०० व्या शिवजयंतीचे अध्यक्षस्थानी होते असेही ते म्हणाले. 

 

यावेळी जयपाल कांबळे, आकाश देवरे, पत्रकार विकास वाघमारे, रंगनाथ साऊजी, भगवान रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संपादक प्रा.दशरथ रोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार माणिक कोकाटे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार