MB NEWS- *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* •

 *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !*



• *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* •

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     नेहमीच आश्रमातील वयोवृद्धांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: आत्मियतेने लक्ष घालणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आज (दि.६) घाटनांदुर रस्त्यावरील गुरुदास सेवा आश्रमातील वयोवृद्धांची थांबून अस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.



     वंदनीय राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणी अनुसार चालत असणारे घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रमाशी नेहमीच ना.धनंजय मुंडे यांची आत्मियता दिसुन येते. आज (दि.६) ना.धनंजय मुंडे यांनी आश्रमातील वृद्ध महिला पुरुषांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच गुरूदास सेवाश्रमास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आश्रमातील वयोवृद्धांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना घेतली. मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या मदती साठी सर्वांनी ना.मुंडे यांचे आभार मानले. याप्रसंगी गुरुदास सेवाश्रम सेवाभावी संस्थेच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री .दासलालाजी महाराज, गुरुदास सेवाश्रम संस्थेचे सरचिटणीस सुरेश (आण्णा) टाक, गुरुदास सेवाश्रम संस्थेचे उपाध्यक्ष श्री नरहरी शहाणे (मंठेकर ग्रंथमित्र ),संचालक श्री सुभाषराव चव्हाण ,कोषाध्यक्ष यमुनाबाई सोनवणे, चंद्रकांत दहिवाळ, सुश्री श्यामाताई, सुश्री बहिणाबाई , सोमनाथ शहाणे, बळीराम वाघमारे , दीपक दहिवाळ व आश्रमातील लाभार्थी वृद्ध ,सेवाधारी,बहुसंख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार