परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- श्री. १०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव बेलवाडी येथे साजरा

 श्री. १०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव बेलवाडी येथे साजरा




 परळी वैजनाथ - श्री.१०८ शंभुलिंग शिवाचार्य अंबाजोगाईकर महारारजाच्या हस्ते श्री.संतशिरोमणी मन्मथस्वामी महाराज यांचा १२:२१ मिनीटानी जन्मोत्सव करण्यात आला.

ऑनलाईन च्या माध्यमातुन तीन दिवस परमहस्य पारायण, चित्रकला स्पर्धा तसेच रांगोळी स्पधा घेण्यात आल्या.तसेच समाजातील समाजाचे नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. 



ऑनलाईन घेण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी चे बक्षीस वितरण करण्यात महाराजांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुबाई राजाभाऊ वारकरे सरपंच वाडी पिंपळगांव,ज्योती दिनेशअप्पा चलवदे ग्रामपंचायत सदस्या राणी सावरगांव,गौरीशंकर मोदी सेवानिवृत्त शिक्षक, केदारेश्वर विद्या मंदिर उखळी बु., प्रा.सौ.चेतना गौरशेटे माँ.जिजाऊ रत्न पुरस्कार,संतोष पंचाक्षरी सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या पुरस्कार बद्दल समाजाच्या वतीने या मान्यवरांचे सत्कार केला. 



ऑनलाईन चित्रकला स्पर्धाचे प्रथम पारितोषीक कु.सुप्रिया सिध्देश्वर घोंगडे द्वितीय गणेश विशाल कुरूडे तृत्तीय सेजल संतोष सुगरे व ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे प्रथम परितोषीक कु.शिवानी कैलासअप्पा एस्के द्वितीय कु.अनधा संतोष चौधरी यांना सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर श्री १०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांचे आशिवचन झाले महाराजांच्या हस्ते उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला कायक्रमाचे सुत्र संचालन सोनाली रोडे व आभार प्रर्दषन अनिल अष्टेकर नगरसेवक यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!