परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*टोकवाडी येथे सभापती चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन*

 *टोकवाडी येथे सभापती चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन*



परळी (प्रतिनिधी)----: परळी तालुक्यातील टोकवाडी येथे सभापती चषक टोकवाडी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.



स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक प्रमूख ३३३३३/- द्वितीय पारितोषिक २२२२२/- तृतीय पारितोषिक १११११/- चतुर्थ पारितोषिक ७,७७७/- विजेत्या संघाला बक्षीस देण्यात येणार असल्याचे नवनाथ क्रिकेट क्लब संघाच्या पदाधिकारी यांनी कळवले आहे.



या कार्यक्रमाला ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, सूर्यभान (नाना) मुंडे , पं.स.सदस्य माऊली मुंडे , दशरथ (आबा) मुंडे, गोविंद बबनराव फड, तुकाराम काळे, रणजित सोळंके, लक्ष्मण मुंडे, यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.



नवनाथ क्रिकेट क्लब संघाचे सर्व पदाधिकारी यांना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौतुकास्पद कार्य केले यावेळी श्री.मुंडेनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!