MB NEWS- *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण*

 *तीर्थक्षेत्र विकास योजनेतील प्रस्तावित कामांचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी चित्रफीतीद्वारे सादरीकरण*



परळी दि 6......... : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झाला असुन या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधुन वैद्यनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. या योजनेतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 07 फेब्रुवारी रोजी दर्शन मंडप येथे होणार आहे.


परळी शहराची ओळख असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परिसराचा धार्मिक कार्या बरोबरच सर्वागीण विकास व्हावा यासाठी ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर झाला असुन या योजनेतुन वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातील सर्व तीर्थ, सुसज्य भक्त निवास, वैद्यनाथ देवल कमिटीच्या अधिपत्याखालील मंदिरांचा विकास तसेच डोंगर तुकाई, कालरात्री देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे.


 तीर्थक्षेत्र विकास योजनेतील ही कामे टप्याटप्याने करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे वैद्यनाथ मंदिर परिसराबरोबरच परळी शहराचा विकसीत चेहरा समोर येणार आहे.


 योजनेतील कामे कशी केली जाणार कुठल्या परिसराचा विकास कसा होणार याची चित्रफीत तयार करण्यात आली असुन या चित्रफीतीचे सादरीकरण रविवार, दि. 07 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता दर्शन मंडप, वैद्यनाथ मंदिर, परळी वैजनाथ येथे परळी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक, भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे.


या चित्रफीत सादरीकरणास वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई सोमनाथअप्पा हालगे, मंदिर देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, न.प.गटनेते श्री. वाल्मिक (अण्णा) कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद शिवाजीराव मुंढे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, संतूक ऊर्फ प्रदिपराव देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, निळकंठ पुजारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, माजी सभापती चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक (नाना) देशमुख, माजी सभापती शरद भाऊ मुंडे, माजी उपनगराध्यक्ष आय्युब भाई पठाण, स्वच्छता सभापती अनवर मिस्कीन, शिक्षण सभापती गोपाळकृष्ण आंधळे, पाणी पुरवठा सभापती सौ. उर्मिला ताई मुंडे, बांधकाम सभापती सौ. अन्नपुर्णा ताई आडेपवार, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती गंगासागर शिंदे व सर्व सदस्य/सदस्या नगर परिषद, परळी वैजनाथ आदिंची उपस्थिती राहणार असुन आपण या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन वैद्यनाथ देवल कमिटी व नगरपरिषद, परळी वैजनाथ च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार