MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक- प्रा. प्रवीण फुटके

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक- प्रा. प्रवीण फुटके



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

    जवहार शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतिहास विभागाअंतर्गत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रा प्रवीण फुटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक आहेत असे मत प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के इप्पर , उपप्राचार्य डॉ जे. व्ही. जगतकर प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डि.के आंधळे व प्रमुख व्याख्याते, परळी पत्रकार संघाचे सचिव व कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा. प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के.शेप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर प्रमुख वक्ते प्रा.फुटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय पैलूवर विचारमंथन केले. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील जाती व्यवस्था, दुष्काळ,स्त्री भ्रूण हत्या, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार अशा विविध समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांनी आपापले समाजसुधारक व थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जात आहे असे होत असेल तर त्यात सर्वसमावेशकता दिसून येत नाही अशा पद्धती बंद झाल्या पाहिजेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज एका विशिष्ट जातीचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे थोर महापुरुष होते असेही मत याप्रसंगी व्यक्त केले म्हणून त्यांना एका विशिष्ट जातीच्या बंधनात ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात विविध जाती-धर्माचे लोक होते त्यांच्या आधारावरच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेही सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.आर. के.इप्पर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगत असताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अखंड महासागरासारखे आहे. त्यांच्या विविध पैलूवर संशोधन केले जात आहे असे सांगून अशा प्रकारचे संशोधन दर्जा उंचावण्यासाठी संशोधन निपक्षपातीपणे व्हावे व केलेले संशोधन ग्रन्थ प्रकाशित करावे अशीही अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी डॉ शेप बी. के. यांनी संपादित केलेला छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणा व सद्यस्थिती हा ग्रंथ प्रा.फुटके सरांना भेट दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. एम.जी. लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !