MB NEWS-*व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं - पंकजाताई मुंडे यांचं आमदारांना मार्गदर्शन*

 *पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील भाजपा आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन* 


*व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं - पंकजाताई मुंडे यांचं आमदारांना मार्गदर्शन* 



उज्जैन । दिनांक १२।

मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपच्या प्रदेश सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. दरम्यान, व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं असल्याचं प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी एका सत्रात मार्गदर्शन करताना केलं.


मित्तल रेव्हेन्यू रिसोर्टच्या सम्राट विक्रमादित्य परिसरात भाजपा आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आजपासून सुरवात झाली. या वर्गाला उपस्थित राहण्यासाठी भाजपच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांचे आज सकाळी इंदौरच्या अहिल्यादेवी होळकर विमानतळावर आगमन झाले. आमदार दिलीप शेखावत, माजी आमदार सुदर्शन गुप्ता, युवा मोर्चा महामंत्री मयुरेश पिंगळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.



 उज्जैन येथे दुपारी 12 वा. आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, संघटन सरचिटणीस सुहास भगत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्थे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनानंतर विविध तीन सत्रात मान्यवर नेत्यांनी उपस्थित आमदारांना संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाचा उद्या समारोप होणार आहे.



*आचरण, व्यवहार आणि व्यक्तित्व विकासावर झालं मार्गदर्शन* 

---------------------------

आजच्या शेवटच्या सत्रात पंकजाताई मुंडे यांनी आचरण, व्यवहार आणि व्यक्तित्व विकास या विषयावर उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, आपण सर्व खूप अनुभवी आहात, मी अजून राजकारणात शिकते आहे. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना आमदारांनी नेहमी सकारात्मक रहावं. भाषा आणि शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. लोकनेते मुंडे साहेब आणि महाजन साहेब यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळेच मी आज जनेसेवेचे काम चांगल्या प्रकारे करू शकत आहे. चांगले संस्कार हे जीवनात फार महत्त्वाचे असतात, आपल्याला येणारे अनुभवच खूप कांही शिकवतात. सत्ता हे आपलं ध्येय नाही तर जनसेवेला वाहून घेणं हे आपलं काम आहे. लोकांचं मन जिंकण कठीण काम असलं तरी आचरण चांगलं ठेवलं आणि संयम बाळगला तर ते कठीण वाटत नाही. विधानसभेत अभ्यासपूर्ण रितीने काम करण्याची खरी गरज असते. सोशल मिडियाचा देखील खुबीने वापर करण्याची आवश्‍यकता आहे. 

शेवटी आपण केलेली जनसेवा हिच आपल्या कामाची ओळख सांगते त्यामुळे सर्वांनी आधुनिकतेची कास धरून जनसेवेचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !