MB NEWS- *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*

 *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आपले गाव आणखी सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी निर्धार केला असुन 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे दि.४ रोजी शुभारंभ करण्यात आला.



         'माझं गाव -सुंदर गाव' या अभियानासाठी परळी तालुक्यातून टोकवाडी, गाढे पिंपळगाव व देशमुख टाकळी या तीन गावाची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा शुभारंभ टोकवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री बालाजी मुंडे, बीडीओ संजय केंद्रे , गावच्या सरपंच गोदावरी राजाराम मुंडे, विस्ताराधिकारी श्री बाबळे, श्री गोडभरले, शाळेचे मुख्याध्यापक श्री यवतेकर, अंगणवाडी सुपरवायझर देशमुख, डॉ. राजाराम मुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी या अभियानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजाराम मुंडे यांनी केले.सूत्रसंचालन श्री श्याम आघाव सर यांनी केले.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी गावकर्यांनी व्यक्त केला.



          कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री तुकाराम काळे, सौ कल्पना मुंडे, संजय मुंडे, सुनील मुंडे, बालाजी आघाव, ग्रामसेवक आशा क्षिरसागर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनिस, आशा वर्कर्स, स्वच्छता ग्रही ,ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार