इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्ते निर्माण होतात - बाबुराव पोटभरे

 आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्ते निर्माण होतात  - बाबुराव पोटभरे 



परळी (प्रतिनिधी) : फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्तेनिर्माण होतात असे प्रतिपादन बहुजन विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष  बाबुराव पोटभरे यांनी परळी येथील भीमनगर येथे दि.८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी, रमाई प्रतिष्ठान आयोजित त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सोव कार्यक्रमा प्रसंगी केले. यावेळी विचारमंचावर म.गां.रो.ह.यो.सदस्य तथा पं.स.सदस्य श्रीहरी मोरे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, पं.स.सदस्य मुरलीधर साळवे, अनंत इंगळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, नगरसेवक केशव गायकवाड, किशोर चोपडे, स्वप्नील साळवे आदी उपस्थित होते. या भीमगीताच्या जलसा कार्यक्रमात शुभम मस्के म्हणाले की, आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार - प्रसार भीमगीतांच्या माध्यमातून करणार. बाबुराव पोटभरे पुढे म्हणाले की, वर्तमान केंद्र सरकार संविधान व शेतकरी विरोधी असून भांडवलदार अडाणी - अंबानींना खुली सूट देत आहे. या केंद्र सरकारला अद्दल घडविण्याचे काम केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळच करू शकते असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. हा कार्यक्रम कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.



    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई प्रतिष्ठानचे सुयोग अवचार, प्रशांत चक्रे, तुषार डोंगरे, नितीन जगतकर, अनंत जगतकर, निशात बनसोडे, रोहन उपाध्याय, सागर हनवते आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या