MB NEWS-कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन

 *कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन 



परळी प्रतिनिधी.....

 गेल्या वर्षी मार्च 2020 पासून महाराष्ट्र राज्य, देश व जगभरात कोरोणाच्या महामामारीमुळे राज्यातील मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार, शेतकरी सर्वांना अतोनात त्रास झाला असून छोटे-मोठे उद्योगधंदे व्यापार, दुकाने सर्व बंद झाले होते. त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली गेली हा काळ फक्त जिवंत राहण्यासाठी आहे सर्वांनी काळजी घ्यावी असे आपणच नेहमी माध्यमाद्वारे जनतेचा आवाहन करत होतात मात्र याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली त्यावेळी संभाजी ब्रिगेड सह अनेक पक्ष संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली , तेव्हा आघाडी सरकारचे विज मंत्री श्री. नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते, मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास सर्व नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन नोटीस पाठवले आहेत हा मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून हुकूमशाही शासन करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे. यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामान्यजनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे व सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे. तसेच नुकतेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर भरमसाठ वाढवलेले आहेत यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे,यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत नसता या जनहिताच्या मागणीसाठी *संभाजी ब्रिगेडच्या* वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती..

परळी वै .येथे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना निवेदन देताना *संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने शिवश्री संजय वाळके* आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !