MB NEWS-ना सॅनिटायझर, ना मास्क नागरिक बिनधास्त

 ना सॅनिटायझर, ना मास्क नागरिक बिनधास्त !

सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच गर्दी असे चित्र आहे. परंतु, अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून येते. बहुतांश नागरिक कोरोना गेला... या भ्रमात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. 




कोरोनापासून बचावासाठी प्राथमिकद़ृष्ट्या संरक्षण म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, रस्त्यावर थुंकू नये हे नियम करण्यात आले. संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, तोपर्यंत अगदी काटेकोर अंमलबजावणी झाली. लस आल्यानंतर मात्र जणू कोरोना गेलाच... या आविर्भावात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. अशा प्रकारामुळे संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. 

    मात्र काही लोकांचे नको तेवढे धाडस वाढले आहे. नियम मोडले जात आहेत. शहराच्या विविध भागांत गर्दीच गर्दी असे चित्र नित्याचेच बनले आहे. सर्वच शासकीय कार्यालये तुडुंब भरलेली दिसत आहेत. कामानिमित्त अनेक नागरिकांची ये-जा वाढलेली आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील भाजी मंडई, बाजारपेठा, खाऊ गल्ल्यांतून रात्रंदिवस गर्दी होत आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच गर्दी असे चित्र आहे. परंतु, अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून येते. बहुतांश नागरिक कोरोना गेला... या भ्रमात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. परिणामी, नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे आदीबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मास्क न वापरणार्‍या व्यक्ती तसेच दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, भाजी मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालवताना चेहर्‍यावर अर्धवट मास्क लावणे व गर्दी करून सुरक्षित अंतराचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार