MB NEWS-परळीत दोन गटात तुफान हाणामारी ; सामाजिक शांतता भंग करणारांविरुद्ध पोलीसांनीच फिर्याद देत नोंदवला गुन्हा

 परळीत दोन गटात तुफान हाणामारी ; सामाजिक शांतता भंग करणारांविरुद्ध पोलीसांनीच फिर्याद देत नोंदवला गुन्हा



 परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)....

      नेहमीच  दोन गटांत भांडणं, मारामारी अशा घटना घडतात. अनेकवेळा या भांडणांचे स्वरूप गंभीर असते. लाठ्या काठ्या, शस्त्र, तलवार, दगडफेक आदींचा वापर करत आपल्या गटाविरुद्ध खुन्नस काढली जाते.परंतु यानंतर कोणीही पोलीस ठाण्यात जात नाही अशावेळी कोणाचीच तक्रार नाही या कारणांमुळे अशा प्रकारांबाबत पोलीस कारवाई होत नाही.मात्र सामाजिक शांतता मात्र भंग पावते.असाच काहीसा प्रकार परळीत घडला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. पोलीसात कोणीच गेले नाही मग सरकारी पक्ष म्हणून पोलीसांनीच फिर्याद देत याप्रकरणी गुन्हा दाखल  केला आहे.


          परळी शहरातील भोई गल्लीतील रहिवासी असलेले नागरीकांचे  दोन गट आपसातील जुने भांडणाचे कारणावरून सोमवार (दि.१५) रोजी रात्री ८.४५ वा सुमारास समोरासमोर भिडले. तलवार व काठी यांचा सर्रास वापर करून दोन गटात तुंबळ भांडणे सुरू असताना पोलीसाना याची माहिती मिळाली.ही माहिती मिळताच  परळी शहर पोलीस व डी बी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वेळीच भांडणात  हस्तक्षेप केला . यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे पोलीसांनीच दोन्ही गटातील सामाजिक शांतता भंग करणारा विरुद्ध फिर्यादी दिली. फिर्यादी हनुमान मुंडे (पोलीस नाईक परळी शहर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख एजाज, मुज्जु खान, गफार सय्यद,अजहर खान, शेख नदीम, शेख शहानवाज व इतर सात ते आठ इसम राहणार भोई गल्ली परळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद क्रमांक 29/2021 कलम143,147, 148, 149,307, 160,323, 504,506, भांदवि सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा नुसार परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे .अन्य ईसम जखमी असून ते पुढिल उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. प्रकरणाचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक खरात हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !